गोदावरी टाइम्स - ब्रेकिंग | सुटका प
नवी दिल्ली | ११ ऑक्टोबर सकाळी १०:१५ वाजता | गोदावरी टाइम्स
२२ तासांच्या ड्राम्यानंतर शेवटी CJP च्या तिन्ही नेत्यांची सुटका झाली आहे. अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्ली कॅन्ट पोलीस स्टेशन येथे सकाळी ९ वाजता स्पेशल कार्यकारी न्याय दंडाधिकारी (SEM) कोर्टासमोर हजर केले आणि कोर्टाने तात्काळ सुटकेचा आदेश दिला.
CJP च्या लीगल हेड रत्ना सिंह यांनी X वर याला दुजोरा दिला -
"Executive Magistrate court releases Abhijeet, Saurav and Ashutosh."
दिल्ली पोलिसांना धक्का का?
पोलिसांनी तिघांना BNSS च्या कलम १२६ आणि १७० अंतर्गत प्रतिबंधात्मक अटक (Preventive Arrest) दाखवली होती - म्हणजे "गुन्हा घडण्याआधीच शांतता भंग होऊ नये म्हणून अटक". शनिवारी ३,००० आंदोलकांना सोडले, पण फक्त CJP नेत्यांना "Due Legal Process" च्या नावाखाली ठेवून घेतले होते.
पण आज दंडाधिकाऱ्यांसमोर पोलिसांना ठोस कारण देता आले नाही. कोर्टाने हमीपत्राची सक्ती न करता थेट सुटका केली. हा दिल्ली पोलिसांच्या रणनीतीला मोठा धक्का मानला जात आहे.
कसे अटक केले होते?
- शनिवारी सकाळी १०:१९ वाजता मुंबई-दिल्ली विमान उतरताच पोलीस थेट विमानाच्या सीटवरून तिघांना उचलून प्रायव्हेट गेटमधून अज्ञात स्थळी घेऊन गेले होते.
- २२ तास संपर्क तुटला होता. दिपके यांच्या आजीचे निधन झाले, कुटुंबाने अंत्यसंस्कार थांबवून ठेवले होते, अशीही बातमी समोर आली होती.
पुढे काय?
सुटकेनंतरही CJP थांबणार नाही. पक्षाने आज दुपारी पुन्हा जंतर-मंतर २.० ची हाक दिली आहे. ध्रुव राठी यालाही गुरूग्राम पोलिसांनी रात्री सोडले आहे. तर उद्या सोमवारी INDIA आघाडी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढणार आहे.
दिल्ली पोलिसांनी जरी सुटका केली असली तरी आजही ३० ठिकाणी ट्रॅफिक डायव्हर्शन आणि मेट्रोवर नजर ठेवण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments