गोदावरी टाइम्स - मोठी राजकीय खेळी | मुंबई
पुणे/मुंबई | ४ ऑक्टोबर (अपडेट १७ ऑक्टोबर) | गोदावरी टाइम्स
महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य अशी ओळख असलेल्या शरद पवार यांनी अखेर आपले पत्ते उघडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तटस्थ भूमिका घेतलेल्या पवारांनी आता थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ‘विराट गर्जना मोर्चा’ ला जाहीर पाठिंबा दिला आहे.
पवारांच्या या एका निर्णयामुळे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांच्याही गोटात एकच खळबळ उडाली आहे.
पवार नेमके काय म्हणाले?
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी (SP) प्रमुख शरद पवार म्हणाले -
"ही मागणी फक्त मुंबईपुरती मर्यादित नाही. पुणे, नागपूरसह राज्याच्या अनेक भागात SIR बद्दल शंका उपस्थित होत आहे. जेव्हा सर्व संबंधित राजकीय पक्ष एकत्र येऊन या अनियमिततेवर तोडगा काढतील आणि दोषींवर कारवाईचा निर्णय घेतील, तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू."
SIR म्हणजेच मतदार याद्यांचे विशेष सघन पुनरिक्षण आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधूंनी मुंबईत काढलेल्या मोर्चाचा हा मुद्दा होता.
तीन गटांना एकाच वेळी धक्का कसा?
१. उद्धव ठाकरे गटाला धक्का?
उद्धव ठाकरे यांना वाटत होते की, पवार पूर्णपणे त्यांच्या नेतृत्वाखाली येतील. पण पवारांनी ‘सर्व पक्ष एकत्र आले तरच’ अशी अट टाकून काँग्रेस आणि आपल्याशिवाय निर्णय होणार नाही, असा संदेश दिला आहे. म्हणजेच उद्धवसेनेचा एकला चलो रे चा डाव फसला.
२. शिंदे गट आणि भाजपला धक्का?
महायुती सरकार SIR च्या बाजूने आहे. पवारांनी थेट SIR मध्ये अनियमितता असल्याचे मान्य करून आणि CEC च्या विरोधातील मोर्चाला पाठिंबा देऊन महायुती सरकारलाच अडचणीत टाकले आहे.
३. अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का?
अजित पवार गट नेहमी म्हणत आला आहे की, शरद पवार आणि आम्ही एकच आहोत, फक्त भूमिका वेगळ्या आहेत. पण आता काकांनी थेट विरोधी मोर्चाला पाठिंबा देऊन पुतण्यापासून फारकत घेतल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा एकदा दोन गटांमधील दरी वाढली आहे.
ठाकरे बंधूंचा ‘विराट गर्जना मोर्चा’ काय होता?
४ ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मेट्रो सिनेमा ते BMC मुख्यालय असा संयुक्त मोर्चा काढला होता. या मोर्चात -
- कोणताही पक्षाचा झेंडा नव्हता, फक्त तिरंगा होता.
- मागणी होती - CEC ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि महाराष्ट्रातील SIR रद्द करा.
- राज ठाकरे म्हणाले होते - "विधानसभा निवडणुकीत ४०-६० लाख मतदार वाढवून सत्ता काबीज केली आणि आता SIR च्या नावाने २ कोटी मतदार वगळले जात आहेत. हे कोण आहेत?"
या मोर्चात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी SP चे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख सहभागी झाले होते.
गोदावरी टाइम्स विश्लेषण: शरद पवारांनी गेम फिरवला आहे खरा, पण त्यांनी स्वतः मोर्चात न येता पाठिंबा देऊन ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका घेतली आहे. ते सर्व पक्षांना एकत्र आणून महायुती विरोधात मोठी आघाडी बांधण्याच्या तयारीत आहेत. येणाऱ्या महापालिका निवडणुकीपूर्वी वारं नक्कीच फिरणार, यात शंका नाही!

Post a Comment
0 Comments