*भिवंडी / ठाणे:* कल्याण पश्चिमचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
22 वर्षीय विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. पतीसोबतचा वाद मिटवण्यासाठी मध्यस्थीच्या बहाण्याने कार्यालयात बोलावून बापगाव येथील फार्म हाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी या प्रकरणी माजी आमदार पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार असून पोलिसांची सहा पथके त्यांचा शोध घेत आहेत.
भिवंडी सत्र न्यायालयाने माजी आमदार पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. पुढील तपास पडघा पोलीस करत आहेत.
*- गोदावरी टाइम्स प्रतिनिधी*

Post a Comment
0 Comments