*⚖️ गोदावरी टाइम्स | सुप्रीम कोर्ट ब्रेकिंग - 24 Sept*
*नवी दिल्ली -* CEC आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या 2023 च्या कायद्यावरून सुप्रीम कोर्टात खळबळ उडाली.
*कोर्टात नेमकं काय झालं?*
न्या. दिपांकर दत्ता आणि न्या. सतिश चंद्र शर्मा यांच्या 2 सदस्यीय खंडपीठात मतभेद झाले. एका न्यायाधीशांनी हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्याची गरज नाही म्हटले, तर दुसऱ्यांनी 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवावे म्हटले. हा Split Verdict असल्याने आता हे प्रकरण सरन्यायाधीशांकडे जाणार आहे, जे मोठे घटनापीठ स्थापन करतील.
*मूळ वाद काय?*
- 2023 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशांनी सांगितले होते: निवड समितीत PM + विरोधी पक्षनेता + *सरन्यायाधीश* असावेत.
- मोदी सरकारने 2023 मध्ये कायदा करून सरन्यायाधीशांना काढले आणि त्यांच्या जागी *PM नियुक्त केंद्रीय मंत्री* आणला.
- आता समिती: PM + PM चा मंत्री + विरोधी पक्षनेता = म्हणजे सरकारला 2:1 बहुमत. विरोधकांचा आरोप - आयोग सरकारच्या हातचे बाहुले होईल.
*न्यायाधीशांची टिप्पणी:*
न्या. दत्ता म्हणाले, "PM ने निवडलेला मंत्री कधीच PM च्या विरोधात जाणार नाही, त्यामुळे विरोधी पक्षनेत्याची भूमिका केवळ शोभेची (Ornamental) आहे. हे म्हणजे बॅटिंग टीमने अम्पायर निवडण्यासारखे आहे!"
आता अंतिम फैसला 5 न्यायाधीशांचे घटनापीठ देणार.
*Godavari Times • 24 Sept 2026*

Post a Comment
0 Comments