Type Here to Get Search Results !

*📰 'मतचोरी'नंतर 'कायदा चोरी' आणि त्यानंतर 'संस्था चोरी' - राहुल गांधींचा हल्लाबोल*

 *नवी दिल्ली -* लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.


*काय म्हणाले राहुल गांधी?*

"मतचोरी, कायदा चोरी, संस्था चोरी - हा देशाविरुद्धचा गुन्हा आहे. संविधानाच्या शत्रूंचा पर्दाफाश झाला आहे. न्याय मिळेलच," असे राहुल गांधी म्हणाले.


राहुल गांधींचा आरोप आहे की सर्व निवडणुका रिग्ड आहेत. इंदिरा गांधींसारख्या लोकप्रिय नेत्यालाही अँटी-इन्कमबन्सीचा सामना करावा लागला, पण मोदी-शहांना कधीच का होत नाही, असा सवाल त्यांनी केला.


*प्रकरण काय?*

Indian Express च्या रिपोर्टनुसार, मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) वरून निवडणूक आयोगातच फूट पडली आहे. आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या 10 महिन्यात तब्बल 14 वेळा आक्षेप घेतले आहेत. त्यांच्या माहितीशिवाय आदेश काढले गेल्याचा आरोप आहे. यावरूनच राहुल गांधींनी भाजप, RSS आणि निवडणूक आयोगाने देशद्रोह केल्याचा आरोप केला आहे.


निवडणूक आयोगाने मात्र सर्व निर्णय एकमताने झाल्याचे म्हटले आहे.


*Godavari Times • 24 Sept 2026 • #VoteChori #RahulGandhi*


Post a Comment

0 Comments