Type Here to Get Search Results !

*पुण्यात सिनिअर PI, PSI सह तब्बल 18 पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल*

 गोदावरी टाइम्स ब्रेकिंग


*पुणे, 25 सप्टेंबर 2026* - पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकारानंतर आता मोठी कारवाई झाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्यासह 18 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


*नेमकं काय घडलं होतं?*

जुलै 2026 मध्ये 4 प्रौढ आरोपी आणि खुनाच्या गुन्ह्यातील 8 अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण करून त्यांची जाहीर धिंड काढल्याचा आरोप आहे. अल्पवयीन मुलांना तर पोलीस वाहनाच्या बॉनेटला दोरीने बांधून आंबेगाव पठार ते भारती विद्यापीठ ठाण्यापर्यंत फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.


*CID कडून कारवाई:*

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने (MSHRC) 9 सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा अहवाल दिल्यानंतर आणि महासंचालकांच्या आदेशानंतर CID ने ही कारवाई केली आहे. CID चे DySP संकेत गोसावी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.


- दुसऱ्या FIR मध्ये SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह, बाल न्याय कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील कलमे लावण्यात आली आहेत.

- हा तपास आता ADGP दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments