*📰 गोदावरी टाइम्स | सविस्तर बातमी*
*नवी दिल्ली (23 Sept 2026) -* शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद आणि आमदार अपात्रता प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाची सुनावणी आज होऊ शकली नाही.
*काय घडले?*
- सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार होती.
- खंडपीठाची बैठक बोलावता न आल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली
- उद्या (बुधवार) सुनावणी होण्याची शक्यता आहे.
*पार्श्वभूमी:*
- मंगळवारच्या सुनावणीत न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते - दोन गटांना स्वतंत्र चिन्हे का दिली नाहीत?
- ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, देवदत्त कामत तर शिंदे गटाकडून नीरज किशन कौल युक्तिवाद करत आहेत.
- वकील असीम सरोदे यांच्या मते, उदय सामंत, संजय राठोड, दादा भुसे यांच्या सह्यांचे कागदपत्र शिंदे गटासाठी अडचणीचे ठरू शकते.
*Godavari Times • 23 Sept 2026 • #Shivsena #SupremeCourt*


Post a Comment
0 Comments