*📰 गोदावरी टाइम्स | शिक्षकांसाठी दिलासा - 23 Sept 2026*
*मुंबई -* राज्यातील 4.5 लाख शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. शिक्षण संचालनालयाने शिक्षकांच्या पगाराची तारीख निश्चित केली आहे.
*सरकारचा GR काय सांगतो?*
- ज्या शिक्षकांनी *Shalarth प्रणालीवर 20 सप्टेंबरपर्यंत e-KYC पूर्ण केले आहे*, त्यांचा पगार *प्रत्येक महिन्याच्या 1 ते 5 तारखेदरम्यान* खात्यात जमा होणार.
- पगार प्रक्रिया ऑनलाइन वेतन अधीक्षक कार्यालयामार्फत होणार.
- 25 ते 26 तारखेला निधी शासनाकडून प्राप्त होऊन 1 तारखेपासून वितरण सुरू.
*ज्यांनी e-KYC केले नाही त्यांचे काय?*
ऑक्टोबरपासून पगार रोखला जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तातडीने शाळांनी आपल्या शिक्षकांची माहिती Shalarth वर अपडेट करणे बंधनकारक आहे.
*Godavari Times • #Shikshak #Salary*

Post a Comment
0 Comments