*नवी दिल्ली/पुणे |* दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारच्या TRAI ने मोबाईल ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. Jio, Airtel, Vi सारख्या टेलिकॉम कंपन्यांना TRAI ने दणका दिला असून आता ग्राहकांना फक्त कॉलिंगसाठी स्वस्त रिचार्ज करता येणार आहे.
*TRAI चा नवा नियम काय?*
TRAI ने *Telecom Consumer Protection (13th Amendment) Regulation 2026* दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी जाहीर केला. यानुसार:
- प्रत्येक टेलिकॉम कंपनीला *Voice आणि SMS-Only* रिचार्ज प्लॅन देणे बंधनकारक
- 30 दिवस किंवा त्यापेक्षा कमी वैधतेच्या प्रत्येक डेटा प्लॅनसोबत तेवढ्याच दिवसांचा फक्त कॉलिंगचा प्लॅन स्वस्त दरात द्यावा लागेल
- दर महिन्याला एकाच तारखेला रिन्यू होणारा प्लॅन द्यावा लागेल
- डेटा नको असलेल्या ग्राहकांना आता उगाच डेटा पॅकसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत
*कोणाला फायदा?*
देशात जवळपास *25 ते 30 कोटी* लोक साधा फीचर फोन वापरतात. दुसरा सिम ठेवणारे, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक यांना याचा थेट फायदा होणार आहे. आतापर्यंत 200-300 रुपयांचा डेटा पॅक घ्यावा लागत होता, आता फक्त *₹99 पासून Voice-Only* प्लॅन मिळणार आहे.
*कधीपासून लागू?*
हा नियम *21 ऑक्टोबर 2026 पासून* लागू होणार आहे. म्हणजे याच दिवाळीत ग्राहकांची दिवाळी आनंदी होणार!
TRAI ने म्हटले आहे - "कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आणि आर्थिक क्षमतेनुसार रिचार्ज करण्याचा पर्याय मिळेल".

Post a Comment
0 Comments