Type Here to Get Search Results !

*2 ऑक्टोबर रोजी नाही चालणार UPI, व्यापाऱ्यांची 'नो युपीआय डे' ची घोषणा

 *📰 गोदावरी टाइम्स | मोठी बातमी - 24 Sept 2026*


*मुंबई/भोपाळ -* UPI व्यवहारावर MDR शुल्क लावण्याच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. *2 ऑक्टोबर गांधी जयंती* रोजी *'No UPI Day'* पाळला जाणार आहे.


*काय आहे कारण?*

NPCI ने *15 ऑक्टोबरपासून ₹2000 पेक्षा जास्त* Person-to-Merchant (P2M) UPI व्यवहारावर *0.4% MDR* लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा शुल्क ₹300 पर्यंत (₹75,000 पेक्षा जास्त व्यवहारावर) मर्यादित असेल. पेट्रोलसाठी ₹5 फ्लॅट ठेवला आहे.


*काय होणार 2 ऑक्टोबरला?*

- व्यापारी QR कोड, साऊंड बॉक्स काळ्या कापडाने झाकणार

- केवळ रोख (Cash) किंवा कार्डने व्यवहार

- पोस्टर लावून निषेध


*कौन-कौन सहभागी?*

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स (MACCIA) अध्यक्ष रवींद्र मंगवे यांच्या नेतृत्वात 500 संघटना, तसेच AICPDF, FRTWA, AIMRA, All India Jewellers Federation, Edible Oil Traders Federation यांनी पाठिंबा दिला. मध्य प्रदेशात कालच 125 संघटनांनी प्रात्यक्षिक म्हणून 'No UPI Day' पाळला.


सरकारचे म्हणणे आहे की ₹1 लाखापर्यंत मासिक UPI घेणारे छोटे विक्रेते (P2PM) यांना सूट असेल आणि P2P व्यवहार मोफतच राहणार.


*Godavari Times • #NoUPIDay #UPI*


Post a Comment

0 Comments