पुणे, दि. 9 नोव्हेंबर (गोदावरी टाईम्स प्रतिनिधी) :
दिवाळीनंतर आज किंवा उद्या बँकेत कामानिमित्ताने जाणार असाल, तर आधी ही यादी नक्की वाचा. कारण RBI च्या कॅलेंडरनुसार बँकांच्या सुट्ट्या राज्यानुसार वेगवेगळ्या आहेत. सर्व राज्यांत एकाच दिवशी सुट्टी नाही.
महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाचं -
आज, सोमवार 9 नोव्हेंबर - महाराष्ट्रात बँका सुरू राहतील
उद्या, मंगळवार 10 नोव्हेंबर - महाराष्ट्रात बँका बंद राहतील
उद्या बलीप्रतिपदा / दिवाळी पाडवा, गोवर्धन पूजा आणि विक्रम संवत नूतन वर्ष निमित्त महाराष्ट्रात सुट्टी आहे.
आज 9 नोव्हेंबर (सोमवार) - कुठे बँका बंद?
दिवाळी, लक्ष्मीपूजन, गोवर्धन पूजा, विश्वकर्मा दिन निमित्त -
अगरतळा, भोपाळ, चंदीगड, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, जयपूर, कानपूर, लखनऊ, रायपूर
म्हणजे उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, त्रिपुरा, सिक्कीम, मणिपूर, चंदीगड मध्ये आज बँका बंद.
दिल्ली, महाराष्ट्र, कोलकाता, बंगळुरूमध्ये आज बँका सुरू आहेत.
उद्या 10 नोव्हेंबर (मंगळवार) - कुठे बँका बंद?
अहमदाबाद, बेलापूर (नवी मुंबई), बंगळुरू, डेहराडून, गंगटोक, मुंबई, नागपूर
म्हणजे गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, सिक्कीम मध्ये उद्या सुट्टी.
परवा 11 नोव्हेंबर (बुधवार) - कुठे बँका बंद?
भाऊबीज, चित्रगुप्त जयंती, निंगोल चक्कौबा निमित्त -
गंगटोक, इंफाळ, कानपूर, कोलकाता, लखनऊ, शिमला
म्हणजे महाराष्ट्रात 11 नोव्हेंबरला बँका सुरू राहतील.
या आठवड्यात आणखी सुट्ट्या -
- 13 नोव्हेंबर (शुक्रवार) : फक्त शिलाँग (मेघालय) - वांगला महोत्सव
- 14 नोव्हेंबर (शनिवार) : देशभरात दुसरा शनिवार - सर्व बँका बंद
- 15 नोव्हेंबर (रविवार) : देशभरात साप्ताहिक सुट्टी
काय करावं?
बँकेची शाखा बंद असली तरी UPI, ATM, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग सुरू राहील. चेक क्लिअरिंग मात्र सुट्टीच्या दिवशी होणार नाही, याची नोंद घ्या.
म्हणून पुणे-मुंबईकरांनी आजच बँकेचं महत्त्वाचं काम उरकून घ्या, उद्या फेरी मारू नका!

Post a Comment
0 Comments