Type Here to Get Search Results !

*शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, आमदाराचा जोरदार हल्लाबोल; महापालिकेतील प्रकरण न्यायालयात जाणार*

*उल्हासनगर, दि. 3 ऑक्टोबर:* उल्हासनगर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून महायुतीत मोठा वाद उफाळून आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम केल्याचा आरोप होत आहे.

*नेमकं काय घडलं?*

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 ऑक्टोबर रोजी 7 स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची प्रक्रिया पार पडली. आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी नियमानुसार भाजपचे 4 आणि शिंदे सेनेचे 3 अशी नावे निश्चित केली होती.

मात्र महापौर तथा पिठासीन अधिकारी अश्विनी निकम यांनी भाजपच्या दोन नावांना - डॉ. सुरेंद्र सिंग आणि ॲड. अनिता गुप्ता यांना अवैध ठरवून शिंदे सेनेच्या हेमा पिंजानी आणि आशा पवार यांची नावे घुसवली. त्यामुळे शिंदे सेनेचे 5 आणि भाजपचे फक्त 2 नगरसेवक घोषित झाले.

*आमदाराचा हल्लाबोल:*

आमदार कुमार आयलानी आणि जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी पत्रकार परिषद घेऊन महापौरांनी पदाचा गैरवापर करून न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप केला आहे. हा प्रकार बेकायदेशीर असून याविरोधात आम्ही उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात Contempt of Court दाखल करणार असल्याचे वधारिया यांनी सांगितले.

महासभेत निलंबित भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांना बाहेर काढल्याने राडा देखील झाला.


*- गोदावरी टाइम्स*

Post a Comment

0 Comments