Type Here to Get Search Results !

हेडलाईन: अजिंक्य शिंदेंच्या पहिल्याच व्हिडीओने खळबळ, दीपकेंना ताब्यात घेताच मोठं आवाहन; "जिथे असाल तिथे..."




नवी दिल्ली | १० ऑक्टोबर | गोदावरी टाइम्स

दिल्लीच्या जंतर-मंतरवर CJP च्या आंदोलनाला परवानगी नाकारली, संस्थापक अभिजीत दीपके यांना थेट विमानात घुसून अटक केली - तरीही आंदोलन थांबले नाही! उलट दीपकेंच्या एका मास्टरस्ट्रोकने दिल्ली पोलिसांसह केंद्र सरकारची झोप उडवली आहे.

दीपकेंना अटक होणार हे माहित असल्याने त्यांनी आधीच एक प्री-रेकॉर्डेड व्हिडीओ तयार ठेवला होता. पोलिसांनी ताब्यात घेताच CJP ने तो व्हिडीओ रिलीज केला आणि सांगितले - "आता लढाईचा सेनापती अजिंक्य शिंदे!"

व्हिडीओत दीपके काय म्हणाले?

"सर्वांना नमस्ते. जर तुम्ही हा व्हिडीओ पाहताय, याचा अर्थ मला, सौरव दास आणि आशुतोष रांका या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पण आमची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी थांबणार नाही. माझ्यानंतर आंदोलनाचे संपूर्ण नेतृत्व CJP चे राष्ट्रीय संघटना प्रभारी अजिंक्य शिंदे करतील. अजिंक्यच्या सूचनांचे पालन करा. जिथे असाल तिथून या लढ्यात उतरा!"

कोण आहेत अजिंक्य शिंदे? - लातूरचा पोरगा आता दिल्ली गाजवणार

ज्याच्याकडे धुरा सोपवली तो अजिंक्य शिंदे हा काही सामान्य कार्यकर्ता नाही.

१) मूळ मराठवाड्याचा: मूळचा लातूरचा, शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे येथून http://B.Tech. उच्चशिक्षित, आधी पुण्यात IT कंपनीत नोकरी.

२) आप ते CJP: २०१६ मध्ये लाखाची नोकरी सोडून आम आदमी पार्टीच्या युथ विंगचा महाराष्ट्र संयोजक झाला. आपचा सोशल मीडिया कोऑर्डिनेटर होता. आता CJP चा राष्ट्रीय संघटना प्रभारी आणि मुख्य रणनीतीकार.

३) कट्टर कार्यकर्ता: दादर शिवाजी पार्क आंदोलनात गुन्हा दाखल झालेले ४०० जणांत अजिंक्यचेही नाव आहे. 'स्कूल ठीक करो' कॅम्पेनचा मुख्य चेहरा. इन्स्टाग्रामवर २३.२k फॉलोअर्स.

सध्याची स्थिती काय?

  • आज सकाळी १० ऑक्टोबरला Air India विमानाने दीपके दिल्लीत उतरताच दिल्ली पोलिसांचे पथक थेट विमानात शिरले आणि तिघांना ताब्यात घेत अज्ञातस्थळी नेले. त्याआधी CJP च्या वकील रत्ना सिंह यांनाही उचलले.
  • जंतर-मंतरवर पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी CJP ने कॅनॉट प्लेसच्या आऊटर सर्कलमधील LIC बिल्डिंगजवळ आंदोलनाचा नवा स्पॉट ठरवला आहे. तिथे अजिंक्य शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू होणार आहे.
  • दिल्लीत ५०० हून अधिक कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक ताब्यात घेतल्याचा CJP चा आरोप आहे. जंतर-मंतर छावणी बनले आहे.

दीपकेंचा प्लॅन B सक्सेस झाला - एकाला अटकले तर दुसरा तयार! आता अजिंक्य शिंदे दिल्लीचे आंदोलन कसे पुढे नेतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
पोस्टर बनवा

Post a Comment

0 Comments