*गोदावरी टाइम्स - दिल्ली ब्रेकिंग | अभिजीत दिपके*
*नवी दिल्ली | १४ ऑक्टोबर, सकाळी ८:३० AM | गोदावरी टाइम्स*
कॉक्रॉच जनता पार्टी (CJP) वरून मोठी बातमी समोर आली आहे. CJP चे संस्थापक *अभिजीत दिपके* आज सकाळी दिल्लीत पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांची थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, CJP नेते *सौरव दास आणि आशुतोष रांका* यांना आज पहाटेच दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन ५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
*काय आहे नेमके प्रकरण?*
शनिवारी (११ ऑक्टोबर) अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली विमानतळावरच विमानातून उतरताच प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना एका वर्षासाठी शांतता राखण्याच्या बॉन्डवर सोडण्यात आले होते.
पण मंगळवारी सकाळी सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी पुन्हा जंतर-मंतर येथे तिरंगा फडकावून निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंतर-मंतर आता अधिकृत आंदोलन स्थळ राहिलेले नाही (Denotified), तरीही बॅरिकेड्स तोडून तिथे घुसल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*पोलिसांनी कोणते कलम लावले?*
ट्रेसपासिंग (अतिक्रमण), जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, शांतता भंगाचा बॉन्ड मोडल्याप्रकरणी आणि सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा.
*अभिजीत दिपके संतापले! म्हणाले...*
या कारवाईनंतर अभिजीत दिपके यांनी X वर पोस्ट करत पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा साधला:
"आशु आणि सौरव यांना ५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. त्यांची चूक काय? जंतर-मंतरवर तिरंगा फडकावणे! हिंमत असेल तर @narendramodi, विरोध दडपायचाच असेल तर अधिकृतपणे आणीबाणी जाहीर करा, अशा भ्याड डावपेचांमागे लपू नका."
दरम्यान, अभिजीत दिपके आज दुपारपर्यंत दिल्लीत दाखल होणार असून CJP ची पुढील रणनीती काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments