पुणे / सुरत | दि. 9 ऑक्टोबर २०२६
लोकप्रिय व विश्वासार्ह गोदावरी टाईम्स परिवारात नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. श्री हिमांशू भुतडा * यांची * सुरत सिटी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.
गोदावरी टाईम्सच्या संपादक मंडळाने त्यांच्या कार्यक्षमता, सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारितेतील अनुभव लक्षात घेऊन ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.
श्री हिमांशू भुतडा हे सुरत परिसरातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींवर लक्ष ठेवून जनसामान्यांचे प्रश्न गोदावरी टाईम्सच्या माध्यमातून मांडणार आहेत.
संपादकीय मंडळाकडून शुभेच्छा:
श्री हिमांशू भुतडा यांना या नवीन जबाबदारीबद्दल गोदावरी टाईम्स परिवाराकडून हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
या नियुक्तीमुळे सुरत शहरातील बातम्यांना अधिक गती आणि स्थानिक प्रश्नांना न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे


Post a Comment
0 Comments