Type Here to Get Search Results !

*मोठी बातमी! आणखी एका जिल्ह्याचं नाव बदलणार, मोठी घोषणा, काय आहे नवं नाव?*




*मुंबई, दि. 3 ऑक्टोबर:* राज्यातील नामांतराच्या मालिकेत आणखी एका ठिकाणाची भर पडली आहे. केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे.


*1. सांगली - इस्लामपूर आता ईश्वरपूर!*

सांगली जिल्ह्यातील प्रमुख शहर इस्लामपूरचे नाव बदलून आता *‘ईश्वरपूर’* करण्यात आले आहे. भारतीय सर्वेक्षण संस्थेने तपासणी करून हे नाव स्वीकृत प्रक्रियेनुसार असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्राच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून राजपत्र अधिसूचना जारी करण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच अधिकृत फलक लागणार आहेत. हा बदल स्थानिकांच्या सांस्कृतिक भावनांचा आदर म्हणून करण्यात आला आहे. 


*2. केरळचे अधिकृत नाव आता ‘केरळम’!*

देशातील सर्वात मोठा निर्णय - केरळ राज्याचे नाव बदलून *‘केरळम’* करण्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 18 ऑगस्ट 2026 रोजी मंजुरी दिली आहे. केरळ विधानसभेने 2024 मध्ये हा प्रस्ताव मंजूर केला होता, त्यानंतर लोकसभेने आणि राज्यसभेने विधेयक मंजूर केले. संविधानाच्या पहिल्या अनुसूचीत बदल करण्यात आला आहे. 

यापूर्वी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि अहमदनगरचे अहिल्यानगर असे बदल झाले होते.

*- गोदावरी टाइम्स | बातमी मागची बातमी*

Post a Comment

0 Comments