*मुंबई, दि. २:* महाराष्ट्रातील मालमत्ता खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारच्या महसूल विभागाने दस्त नोंदणीबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
कोणत्याही प्रकारच्या दस्त नोंदणीसाठी आता *आधार कार्ड पूर्णपणे अनिवार्य* करण्यात आले आहे. आधार नसेल तर दस्त नोंदणी होणारच नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून, यासंदर्भातील राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे आणि *१ ऑक्टोबर २०२६ पासून* या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
*६३ प्रकारच्या नोंदींसाठी लागू:*
खरेदी-विक्री व्यवहार, बक्षीसपत्र, गहाणखत, वाटणीपत्र यासह एकूण ६३ प्रकारच्या नोंदींसाठी हा नियम लागू असणार आहे. खोटे साक्षीदार आणि खोटे पक्षकार उभे करून होणारी फसवणूक रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
*विशेष तरतूद:* ज्यांच्याकडे आधार क्रमांक नाही, त्यांनी आधार नोंदणीची पावती व अन्य सरकारी ओळखपत्रे जोडावीत. पडताळणीनंतरच व्यवहार अंतिम होणार आहे. १८ वर्षांखालील मुलांसाठी पालकांच्या संमतीने प्रक्रिया होईल.

Post a Comment
0 Comments