Type Here to Get Search Results !

48 आमदारांसह मुख्यमंत्री दिल्ली दरबारी; PM मोदींची भेट




गोदावरी टाइम्स | नवी दिल्ली

हरियाणाच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी हे भाजपच्या सर्व 48 आमदारांसह दिल्लीला पोहोचले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी, 3 ऑक्टोबर रोजी 7, लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी हरियाणातील आमदारांची भेट घेतली.

या बैठकीत राज्यातील सरकारच्या कामकाजाचा आढावा, जनकल्याणकारी योजनांची अंमलबजावणी, जनतेशी संपर्क आणि आगामी काळातील कामाची दिशा याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान मोदी यांनी आमदारांशी विविध विषयांवर संवाद साधला.

बैठकीमुळे चर्चांना उधाण

हरियाणात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाबाबत (SIR) विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असतानाच ही बैठक झाली. त्यामुळे या बैठकीच्या राजकीय वेळेबाबतही चर्चा रंगली. मात्र भाजपच्या हरियाणा प्रदेश नेतृत्वाने ही भेट पूर्वनियोजित असल्याचे सांगितले होते.

विशेष म्हणजे, हरियाणा विधानसभेत भाजपकडे 90 पैकी 48 आमदार आहेत. सर्व 48 आमदारांना पंतप्रधानांसोबत एकत्र भेटण्याची ही महत्त्वाची संधी ठरली.

बैठकीनंतर आमदारांनी पंतप्रधानांनी जनसेवा, सामाजिक काम आणि सरकारच्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यावर भर दिल्याचे सांगितले.

📍 गोदावरी टाइम्स
विश्वासार्ह बातम्या… आपल्या हक्कासाठी…
🌐 www.godavaritimes.com

Post a Comment

0 Comments