Type Here to Get Search Results !

हेडलाईन: अमित शाह बोलले! राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, 2029च्या निवडणुकांमध्ये...



नवी दिल्ली | १३ ऑक्टोबर | गोदावरी टाइम्स

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने १०४ पैकी ९० जागा जिंकल्यानंतर शाह यांनी पत्रकार परिषद घेतली.

अमित शाह काय म्हणाले?

"मला राहुल गांधींना सांगायचे आहे की, SIR च्या नावाखाली घुसखोरांना वाचवण्याची तुमची रणनीती देशाने ओळखली आहे. लोक आता तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत."

"राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २०२९ मध्ये होणाऱ्या दारुण पराभवासाठी तयार राहावे. NDA २०२९ ची लोकसभा निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकणार आहे आणि काँग्रेसचा हा सलग चौथा पराभव असेल."

"१४ पक्षांचे कार्यकर्ते एकत्र करून १.५ किमीच्या परिसरात ८००० लोकांची गर्दी जमवून तुम्ही देशाचा आवाज होऊ शकत नाही. देशाचा आवाज शेतात, गावात, डोंगरात, जंगलात आहे, जिथे तुमची पोहोचच नाही."

शाह यांनी पोटनिवडणुकांचे दाखलेही दिले - नागावमध्ये भाजपने काँग्रेसकडून १.४२ लाख मतांनी जागा हिसकावली, नंदिग्राममध्ये ७६% मतांनी विजय मिळवला.

Post a Comment

0 Comments