*पुणे |* पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने पुणे हादरले आहे. या प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या *सुषमा अंधारे* यांनी आक्रमक भूमिका घेत विश्रांतवाडी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले.
*काय आहे प्रकरण?*
22 सप्टेंबर रोजी वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलिसांना माहिती दिली की 12 सप्टेंबर रोजी 12 वर्षीय मुलीवर अत्याचार झाला. पोलिसांनी *52 वर्षीय कंत्राटी सफाई कामगार जयसिंग साठे (श्रमिक नगर, विश्रांतवाडी)* याला अटक केली असून *POCSO कायद्यांतर्गत* गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे.
*अंधारे का आक्रमक?*
आरोपीला अटक झाली असली तरी त्याला मदत करणाऱ्या त्याच्या कुटुंबातील *दोन महिलांना अद्याप अटक नाही*. तसेच पीडितेच्या कुटुंबाला धक्काबुक्की करून आईला मारहाण केल्याचा आरोप अंधारे यांनी पोलिसांवर केला आहे.
"गणेशोत्सवाच्या काळात 8 दिवसांपासून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. वैद्यकीय तपासणीचे कारण देत अटक टाळली जातेय," - सुषमा अंधारे
*अंधारे यांच्या 3 प्रमुख मागण्या:*
1. हे प्रकरण *फास्ट ट्रॅक कोर्टात* चालवावे
2. *SIT (विशेष तपास पथक)* नेमून सखोल चौकशी करावी
3. हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे *तात्काळ निलंबन* करावे
"न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील," असा इशारा अंधारे यांनी दिला आहे.
*- गोदावरी टाइम्स, पुणे*

Post a Comment
0 Comments