*मुंबई | 27 सप्टेंबर 2026 |* राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष *शरद पवार* आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री *देवेंद्र फडणवीस* यांना पत्र लिहून 17 मोठ्या मागण्या केल्या आहेत.
*पवारांच्या 17 मागण्या काय?*
1. वंचित राहिलेले सर्व तालुके तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करा
2. संपूर्ण जमीन महसूल माफ करा
3. शेती, सहकारी, राष्ट्रीयीकृत, अर्बन बँका, पतसंस्था, फळबाग, महिला बचत गटांचे सर्व कर्ज माफ करा
4. कृषी पंपांचे सर्व वीज बिल माफ करा
5. शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची फी, वसतिगृह व मेस फी माफ करा
6. रोजगार हमी योजनेत 3 KM मध्ये काम द्या, निकष शिथिल करा
7. टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना द्या
8. कृषी पंपांचे लोडशेडिंग थांबवा
9. प्रत्येक कुटुंबाला 25 किलो मोफत धान्य द्या
10. जनावरांच्या चाऱ्यासाठी थेट बँक अनुदान द्या
11. जलसंधारणासाठी विशेष निधी द्या
12. *शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 1 लाख रु. व शेतमजुरांना 25 हजार रु. थेट मदत द्या*
13. फळबाग, केळी, ऊस, धान उत्पादकांना नुकसानभरपाई द्या
14. वाळणाऱ्या फळबागांना टँकरने पाणी द्या
15. वैयक्तिक लाभाचे प्रलंबित अनुदान त्वरित खात्यात टाका
16. दुष्काळ निवारणाचा निधी विभागीय आयुक्तांकडे द्या
17. *दुष्काळावर 3 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून दसरा-दिवाळीपूर्वी मदत द्या*
*सरकारचा निर्णय:* 25 सप्टेंबरला 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर, पीक कर्ज पुनर्गठन, वसुलीला स्थगिती जाहीर केली .

Post a Comment
0 Comments