Type Here to Get Search Results !

*आमदार एका पक्षाचा, लोकसभा लढवली दुसऱ्या पक्षाकडून..! सुप्रीम कोर्टाकडून अपात्रतेवर शिक्कामोर्तब*

 *📰 गोदावरी टाइम्स | सुप्रीम कोर्ट ब्रेकिंग 24 सप्टेंबर 2026



*नवी दिल्ली -* पक्षांतरबंदी कायद्यावरून सुप्रीम कोर्टाने आज मोठा निकाल दिला आहे. तेलंगणातील दानम नागेंदर यांची अपात्रता कायम ठेवली.


*नेमकं काय घडलं?*

- दानम नागेंदर यांनी 2023 मध्ये खैरताबाद विधानसभा मतदारसंघातून BRS (कार चिन्ह) पक्षाकडून विजय मिळवला.

- मार्च 2024 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि BRS आमदार असतानाच काँग्रेसच्या (हात चिन्ह) तिकिटावर सिकंदराबाद लोकसभा लढवली. पराभव झाला तरी आमदार म्हणून कायम राहिले.

- BRS आणि BJP ने विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेची याचिका दाखल केली, अध्यक्षांनी फेटाळली.

- त्यानंतर तेलंगणा हायकोर्टाने 18 सप्टेंबर रोजी त्यांना 23 एप्रिल 2024 पासून अपात्र घोषित केले आणि खैरताबाद जागा रिक्त केली.

- नागेंदर यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले.


*सुप्रीम कोर्टात काय झाले?*

सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या. बागची आणि न्या. मोहना यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळली.


- वकील मुकुल रोहतगी म्हणाले - "घरवापसी झाली आहे, पक्षाने माफ केले."

- त्यावर न्या. बागची म्हणाले - *"आया राम गया राम, फिर आया राम!"* आणि *"फिक्स डिपॉझिट (आमदारकी) होती, तुम्ही शेअर मार्केट (खासदारकी) करायला गेलात आणि FD पण गमावली."*

- कोर्ट म्हणाले, "घरवापसी पक्षात होऊ शकते, पण सभागृहात नाही. पक्षांतर केले की सदस्यत्व जाते."


*परिणाम काय?*

- खैरताबाद जागेवर आता पोटनिवडणूक होणार.

- तेलंगणातील इतर 9 फुटीर BRS आमदारांच्या गोटात खळबळ.

- दानम नागेंदर म्हणाले - "निकालाचे स्वागत, निवडणुकीला सामोरे जायला तयार आहे."


*Godavari Times • #DanamNagender*

Post a Comment

0 Comments