Type Here to Get Search Results !

*हेडलाईन: 'एकनाथ शिंदेंनी उठाव केल्यानेच भाजप....'; शिवसेनेच्या आमदाराने डिवचले*



*नंदुरबार | 28 Sept 2026, 3:19 PM |* महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर! शिंदे गटाचे विधान परिषद आमदार *चंद्रकांत रघुवंशी* यांनी भाजपला थेट डिवचले आहे.

*रघुवंशी काय म्हणाले?*

नंदुरबार येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले 

"भारतीय जनता पक्षाला जिवंत एकनाथ शिंदेंनी करून दिलंय, नाहीतर भाजपचं अस्तित्वच राहिलं नव्हतं. महाविकास आघाडीच्या वेळेला भाजप कुठे सत्तेत होता? एकनाथ शिंदेंनी उठाव केला म्हणूनच भाजप आज राज्यात सत्तेत आली आहे."

 "आणि गावीत साहेबांची लॉटरी लागली - अडीच वर्ष आदिवासी मंत्री राहिले."

त्यांनी भाजप नेते *डॉ. विजयकुमार गावित* यांच्यावरही निशाणा साधला.

*संदर्भ:* सरकार हे तीन पक्षांचे (भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट) मिळून बनले आहे आणि तिन्ही दावेदार आहेत असे रघुवंशी म्हणाले.

नंदुरबार जिल्ह्यातील महायुतीतील वाद जुना असून या विधानामुळे भाजप-शिंदे गटातील दरी आणखी रुंदावण्याची शक्यता!


Post a Comment

0 Comments