*📰 गोदावरी टाइम्स | बातमी
*पुणे (23 Sept) -* कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे यांनी महत्त्वाची सूचना जाहीर केली आहे. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी शनिवार २६ सप्टेंबर २०२६ रोजी मुख्य बाजार यार्ड, गुलटेकडी सह सर्व उपबाजार आवार बंद राहणार आहेत.
*कोणते बाजार बंद?*
- फळे-भाजीपाला बाजार
- फुलांचा बाजार
- खडकी, मोशी, मांजरी उपबाजार
२७ सप्टेंबरपासून सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होतील. शेतकरी बांधवांनी गैरसोय टाळण्यासाठी २६ तारखेला शेतमाल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे यांनी केले आहे.
#PuneAPMC #MarketYard #GodavariTimes

Post a Comment
0 Comments