Type Here to Get Search Results !

*सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटसाठी किती सदस्यांची मान्यता आवश्यक? अखेर राज्य सरकारने निश्चित केला आकडा - आता फक्त 51%*




मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील हजारो जुन्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांसाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोसायटी रिडेव्हलपमेंटसाठी लागणाऱ्या सभासदांच्या संमतीचा आकडा अखेर निश्चित करण्यात आला आहे.

सहकार विभागाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाच्या *कलम 79 (अ)* नुसार नवीन आदेश जारी केला आहे. 01fb

*नवीन नियम काय आहेत?*

*1. आता फक्त 51% मान्यता बंधनकारक:*

पूर्वी रिडेव्हलपमेंटसाठी 75% सभासदांची मान्यता लागत होती, मात्र नवीन आदेशानुसार आता *एकूण सभासद संख्येच्या किमान 51% सभासदांची मान्यता* पुरेशी असणार आहे. 


*2. कोरम 2/3 असणे आवश्यक:*

रिडेव्हलपमेंटसाठी आयोजित केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेचा कोरम हा संस्थेच्या एकूण सभासद संख्येच्या *2/3 इतका* राहील. म्हणजे 100 सभासद असतील तर 67 सभासद उपस्थित हवेत. 


*3. 51% प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य:*

या सभेत परदेशात असणारे, आजारी, विकलांग सभासद व्हिडिओ कॉन्फरन्सने उपस्थित राहू शकतात, मात्र संस्थेच्या *एकूण सभासदांच्या 51% सभासद प्रत्यक्ष उपस्थित असणे अनिवार्य* आहे. 

*4. इतर महत्त्वाचे नियम:*

- इमारत सक्षम प्राधिकरणाने धोकादायक जाहीर केली असेल तरच पुनर्विकासाचा निर्णय घेता येईल.

- 1/5 सभासदांनी मागणी केल्यास 2 महिन्यांच्या आत विशेष सभा बोलवावी लागेल.

- सभेची विषयपत्रिका 14 दिवस अगोदर देणे बंधनकारक.

- प्रशासकाला स्वतःहून पुनर्विकासाचा निर्णय घेता येणार नाही.

या निर्णयामुळे मुंबई, पुणे, ठाणे येथील रखडलेल्या रिडेव्हलपमेंट प्रकल्पांना मोठी गती मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments