*पुणे, 21 सप्टेंबर 2026* - पुणेकर आणि सोलापूरकरांसाठी सुपरफास्ट बातमी! पुणे-सोलापूर-वाडी रेल्वे मार्गावर आता गाड्या 160 किमी/तास वेगाने धावणार आहेत.
*काय आहे प्लॅन?*
राष्ट्रीय रेल्वे आराखड्यांतर्गत *मांजरी (पुणे) ते वाडी व्हाया सोलापूर* दरम्यान तिसरा आणि चौथा नवीन ट्रॅक टाकण्यात येणार आहे. यासाठी *16,000 कोटी रुपयांचा* खर्च अपेक्षित आहे.
- *भूसंपादन सुरू:* पुणे जिल्ह्यात 92 एकर आणि सोलापूर जिल्ह्यात 530 एकर जमीन संपादित केली जात आहे.
- *क्षमता वाढणार:* सध्या या मार्गावर दररोज 100+ पॅसेंजर आणि 60 मालगाड्या (कोळसा वाहतूक) धावतात. नवीन ट्रॅकमुळे 32 अतिरिक्त पॅसेंजर आणि 40 मालगाड्या धावू शकणार आहेत.
- *फायदा:* NTPC च्या होटगी आणि कुडगी प्रकल्पांच्या कोळसा वाहतुकीमुळे पॅसेंजर गाड्यांना होणारा अडथळा दूर होईल आणि वंदे भारतसह सर्व गाड्यांचा वेग वाढेल.

Post a Comment
0 Comments