Type Here to Get Search Results !

*📰 पुण्यात पोलिसांची दादागिरी भोवली! आरोपींची धिंड काढून मारहाण केल्याप्रकरणी 13 पोलिसांवर गुन्हा*

 *📰 पुण्यात पोलिसांची दादागिरी भोवली! आरोपींची धिंड काढून मारहाण केल्याप्रकरणी 13 पोलिसांवर गुन्हा*


*पुणे -* महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाच्या (MSHRC) आदेशानंतर पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात 2 वेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.


*काय आहे प्रकरण?*

Crime No. 482/2026 मध्ये 13 पोलिसांवर गुन्हा दाखल झाला आहे. 5 जुलै 2026 रोजी 4 आरोपींनी आत्मसमर्पण केले होते, पण त्यांना रात्री 10:30 वाजता अटक दाखवण्यात आली. त्यानंतर 7 जुलै रोजी SRA कॉलनी, लेक टाऊन परिसरात नेऊन गुडघ्यावर बसवून चालवणे, काठीने मारहाण आणि सार्वजनिक माफी मागायला लावल्याचा आरोप आहे. जनरल डायरीत याची नोंद नसल्याचेही समोर आले.


दुसऱ्या FIR मध्ये अल्पवयीन मुलांना बोनेटवर बांधून धिंड काढल्याचा आणि बेकायदेशीर कोठडीत ठेवल्याचा आरोप आहे. यात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावरही कारवाईची शिफारस MSHRC ने केली होती.


तक्रार CID चे DySP संकेत गोसावी यांनी दाखल केली आहे.


*Godavari Times • 24 Sept 2026*

Post a Comment

0 Comments